
ठाणे : मुंब्रा येथील शिळ परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या १७ अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस बंदोबस्तात आज ही कारवाई सुरू करण्यात आली. उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १२) कठोर भूमिका घेतल्यानंतर खडबडून जागे झालेले ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यावर कारवाईदरम्यान उपस्थित राहण्याची वेळ ओढवली.