

ठाणे : ठाणे महापालिकेच्या १३१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचार थंडावल्यानंतर आता प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाले असून, शहरातील दोन हजार १३ मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ११ सखी मतदान केंद्रे (पिंक बूथ) आणि पर्यावरणाचा संदेश देणारी ११ आदर्श केंद्रे उभारण्यात आली आहेत.