
ठाणे : गोरगरीब नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी सरकारकडून प्राप्त झालेल्या भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेतून बेतवडे येथे घरे उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया ठाणे पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आली होती, मात्र त्यास विकसकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर आता, विकसक नेमून त्यासाठी येणारा खर्च हा महापालिकात विकसकाला कामाच्या टप्प्यानुसार अदा करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारे अनुदानदेखील देणार आहे.