'त्या' तक्रारींनंतर ठाणे महापालिकेला जाग, तात्काळ उपलब्ध करुन देणार 'ही' सुविधा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

गेले काही दिवस सातत्याने शहरात अत्यवस्थ रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. आज तर वारंवार असे प्रकार घडत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका मुख्यालयात आयु्क्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले.

ठाणे  : गेले काही दिवस सातत्याने शहरात अत्यवस्थ रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. आज तर वारंवार असे प्रकार घडत असल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका मुख्यालयात आयु्क्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर यापुढील काळात महापालिकेच्या प्रत्येक परिमंडळानुसार रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा : सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

आता महापालिकेच्या परिमंडळांसाठी विशेष रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच तीनही परिमंडळांच्या ठिकाणी कंट्रोल रुम तयार केले जाणार आहेत. ज्यांना रुग्णवाहिका हवी असेल त्यांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधून त्यांच्यासाठी आता तत्काळ ती सेवा उपलब्ध होईल असा दावा पालिकेने केला आहे.

मोठी बातमी : लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु होणार?

गेल्या काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिके अभावी रुग्णांची मृत्यु होणे, या मुद्यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अखेर महापालिकेने कंत्राटी स्वरुपात रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आता महापलिकेच्या तीन परीमंडळाअंतर्गत आता रुग्णवाहिकेची सुविधा पालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता त्या त्या प्रभाग समितीमधील रुग्णांना आता वेळेत ही सेवा उपलब्ध होईल असा दावा पालिकेने केला आहे. 
त्यानुसार परिमंडळ एक अंतर्गत दोन, परिमंडळ दोन अंतर्गत तीन आणि परिमंडळ तीन अंतर्गत दोन अशा प्रकारे रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय भाईंदरपाडा येथील आयसोलेशन सेंटरसाठाही परिमंडळ तीन अंतर्गत दोन रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महत्वाची बातमी कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

आजपासून आंदोलनाचा इशारा
शुक्रवारी अविनाश जाधव यांनी आंदोलन केल्यानंतर आयुक्त विजय सिंघल यांनी चर्चा केली. त्यावेळी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. पण त्यानंतरही जाधव यांचे समाधान झालेले नसल्याने त्यांनी शनिवारपासून महापालिकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर मनसेप्रमुख राज ठाकरे ठाण्यात येईपर्यंत हे उपोषण सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाची बातमी : सावधान..! मुंबईत "या" वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

कार्डीयाक रुग्णवाहिकेची सुविधा
याशिवाय कार्डीयाक रुग्णवाहिकेची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून परिमंडळ एक मध्ये चार, परिमंडळ दोनमध्ये तीन आणि परिमंडळ तीनमध्ये तीन कार्डीयाक रुग्णवाहिका असणार आहेत. यासाठी तीनही परिमंडळात तीन कंट्रोल रुम तयार करण्यात आले आहेत. नागरीकांनी येथे संपर्क साधल्यास त्यांनी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

Thane Municipal Corporation's claim; An ambulance will be available immediately if contacted


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane Municipal Corporation's claim; An ambulance will be available immediately if contacted