Thane Municipal Officer
esakal
ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे २५ लाखांची लाच घेताना एसीबीच्या ताब्यात
अतिक्रमण प्रकरणात तब्बल ३५ लाखांच्या डीलचा उलगडा
बिल्डरच्या तक्रारीनंतर एसीबीची कारवाई, महापालिकेत खळबळ
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील मोठा घोटाळा (Thane Municipal Officer) उघडकीस आला आहे. महापालिकेचे उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना बुधवारी (दि. १ ऑक्टोबर) सायंकाळी २५ लाखांची लाच घेताना (Shankar Patole Arrested) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.