
ठाणे : एकीकडे ठाणे पालिका क्षेत्रात अनधिकृत शाळांचा मुद्दा गाजत असताना, दुसरीकडे अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ठाणे पालिका सेवेतील उपशिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्याने ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक मिळाले आहेत. मात्र यातील चार ते पाच उपशिक्षक हे मेअखेर सेवानिवृत्त झाले. त्यामुळे येथील मुख्याध्यापकांची पदे पुन्हा रिक्त झाली आहेत. उर्दूमध्ये सुमारे १० आणि हिंदी माध्यमात सुमारे चार मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.