
Thane Municipal Transport
ESakal
ठाणे : ठाणेकरांना उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक व गारेगार प्रवास देण्याचा प्रयत्न टीएमटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असताना, दुसरीकडे गणेशउत्सवाच्या निमित्ताने कोकणात व गावी गेलेल्या नागरिकांमुळे त्याचा परिणाम थेट टीएमटीच्या उत्पन्नावर झाल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात दिवसाकाठी चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते. त्यानुसार मागील दहा दिवसात सुमारे ४० ते ४५ लाखाचा फटका ठाणे परिवहन सेवेला सहन करावा लागल्याचे दिसून आले आहे.