

TMT Bus Digital Pass Scheme
ESakal
ठाणे : महापालिकेच्या परिवहन सेवेने ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल बस पास योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पास काढून ज्येष्ठांना बसचा प्रवास अर्ध्या तिकिटात करता येणार आहे. मात्र या योजनेतील अटी-शर्ती पाहता अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा प्रक्रिया, खर्च आणि कालमर्यादेमुळे उपयुक्त ठरण्याऐवजी त्रासदायक ठरू शकते, अशी वस्तुस्थिती समोर येत आहे.