esakal | ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे 16 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे 16 कोटी

ठाणेकर करदात्यांनी कराचा भरणा करण्यासही विलंब केला आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला.

ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे 16 कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे: कोरोना काळात ठाणे पालिकेच्या तिजोरीत अवघे 16 कोटी शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे पालिकेला केवळ मालमत्ता आणि पाणी करातून अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. परंतु पालिकेकडून देण्यात आलेल्या सवलतींमुळे जून ते जुलै अखेर पर्यंत उत्पन्न मिळाले होते. ठाणेकर करदात्यांनी कराचा भरणा करण्यासही विलंब केला आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला.

हेही वाचा: ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन

पालिकेच्या तिजोरीत सर्व खर्च करुन सध्याच्या घडीला केवळ १६ कोटींचाच निधी शिल्लक आहे. अत्यावश्यक सेवेतील पगार आणि डायघर वीज प्रकल्पासाठी तातडीचा आठ कोटींचा खर्च करण्यात आल्याने पालिकेवर १७ कोटींचा बोजा पडला. त्यात पालिकेच्या तिजोरीत निधी कमी झाल्याने मागील गुरुवारपासून नवी देयके घेण्यासह जुनी बिले अदा करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: ठाणे जिल्हा सहकारी बॅंकेला 'बॅंको' पुरस्कार

दरम्यान, ठाणे पालिकेने काही प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून ३०० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापैकी आतापर्यंत 136 कोटींचे कर्जाचे पैसे अदा करण्यात आले असून त्यातील 164 कोटींची देणी अद्यापही देण्याचे शिल्लक आहे. त्यानुसार याचा वार्षिक हप्ता 36 कोटींचा आहे.

loading image
go to top