
Boy dies after falling into drain
ESakal
डोंबिवली : नवरात्रौत्सव सुरु असल्याने भंडाराचे जेवण करायला ते गेले. जेवण झाल्यावर तेथून निघत असताना आयुषचा पाय उघड्या चेंबरमध्ये पडला आणि त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वेदांतने नाल्यात उडी मारली पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले आणि आयुषचा दुर्दैवी अंत झाला. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली असून बेजबाबदार पालिका प्रशासन याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.