कल्याण: विमानतळाचा प्रश्न पेटला; शेतकर्‍यांवर पॅलेट गनमधून गोळीबार

मयुरी चव्हाण-काकडे
गुरुवार, 22 जून 2017

शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाविषयी विरोध असून जबरदस्तीने जमीन संपादित केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड मुख्य रस्त्यावरील वाहतूक टायर जाळून बंद केली.

ठाणे - नेवाळी विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्याची जमीन जबरदस्तीने संपादित केल्याने नेवाळी नाका परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाडया जाळल्याने शेतकऱ्यांवर पोलिसांकडून पॅलेट गनमधून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शेतकरी जखमी झाल्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाविषयी विरोध असून जबरदस्तीने जमीन संपादित केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड मुख्य रस्त्यावरील वाहतूक टायर जाळून बंद केली. आपल्याच मालकीच्या जमिनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. डावल पाडा नाका परिसरात संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना पॅलेट गनमधून गोळीबार करावा लागला. यात चार ते पाच शेतकरी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्याची शक्यता आहे.

शेतकरी आंदोलनामध्ये सहायक पोलिस आयुक्त सुनिल पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. ब्रिटीश काळात दुसऱ्या महायुद्धावेळी लष्कराने नेवाळी गावाजवळ धावपटीसाठी जागा घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱयांच्या ताब्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा नौदलाने कंपाउंड टाकून त्या जागेवर दावा केला होता. याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जवळपास या भागातील 7 ते 8 गावांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः
बीड: दोन मुलांना जिवंत जाळून पिता फरार
OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...
'मुख्यमंत्री कानात काय म्हणाले'; जयाजी सूर्यवंशींकडूनच ऐका!
#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण
चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार​
कोल्हापूर: पट्टण कोडोलीत रातोरात हटविले डिजीटल फलक, झेंडे
वारीतल कोंदणं: मनान ठरवल अन् गावाला घडवल​
जिल्हा सहकारी बॅंकांना दिलासा

Web Title: Thane news farmers agitation against nevali airport