Attack on Sudhir KokateESakal
मुंबई
Thane Crime: सहकाऱ्यांसह बसले होते, तेव्हा महिलेसह ४ ते ५ जण आले, चॉपर काढला अन् थेट...; शिंदेसेनेच्या नेत्यासोबत काय घडलं?
Sudhir Kokate: शिंदेसेनेचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि त्यांच्या मित्रमंडळींवर टेंभीनाका येथे हल्ला झाला. यामध्ये कोकाटे हे बचावले असून त्यांचे मित्र गंभीररित्या जखमी झाले. या घटनेबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.
सकाळ वृत्तसेवा
ठाणे: शिवसेनेचे (शिंदे गट) माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि त्यांच्या मित्रमंडळींवर रिक्षा आणि दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चॉपरसारख्या दिसणाऱ्या हत्याराने टेंभीनाका येथे हल्ला चढवला. यामध्ये कोकाटे हे बचावले असून त्यांचे मित्र गजानन म्हात्रे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. कोकाटे यांच्या तक्रारीवरून आफरीन खान, हानिफ आणि अन्य अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.