
अंबरनाथ : धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये आज सकाळी घडली. यामध्ये दोन विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले असून या दोन्ही विद्यार्थ्यांना स्थानिकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत व्हॅन चालकाला ताब्यात घेतले. मात्र या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.