ठाणे : जुना कोपरी पूल दोन दिवस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे : जुना कोपरी पूल दोन दिवस बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मुंबई आणि ठाण्याला जोडणारा जुना कोपरी पूल आजपासून दोन दिवस (१६ ते १७ नोव्हेंबर) चाचणीसाठी बंद राहील. सकाळी ७.३० ते १०.३० व सायंकाळी ५ ते ९ दरम्यान तो बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व वाहने नव्या पुलावरून सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा: ‘ते सरकार पाडून दाखवा म्हणतात ना’ सध्या त्यात इंटरेस्ट नाही

त्याआधी सध्या असलेला गुरुद्वार येथील कोपरीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येईल. सकाळी काही वाहने गुरुद्वारा सेवा रस्त्यावरून मुंबईकडे जातील. संध्याकाळी काही वाहने हरीओम नगरकडून सेवा रस्त्याने गुरुद्वारामार्गे तीनहात नाका पुलाखाली येतील. दरम्यान, कोपरी, हरीनिवास किंवा गोखले रोडने तीन हात नाका पुलाच्या डाव्या बाजूने कोपरी पुलाकडे जाण्यास बंदी असेल. त्याऐवजी सेवा रस्त्याचा वापर करावा लागेल, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

loading image
go to top