

Thane Railway Station Modernisation
ESakal
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले ठाणे रेल्वे स्टेशन आधुनिक सुविधांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मान्सूनपूर्व तयारी, प्रवाशांची सुरक्षा आणि वाढती वर्दळ लक्षात घेऊन स्थानकावरील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांनी संयुक्त पाहणी दौऱ्यादरम्यान एस्केलेटर, सार्वजनिक शौचालये, ड्रेनेज व्यवस्था, वैद्यकीय कक्ष, पादचारी पूल आणि १५ डब्यांच्या लोकल ट्रेनच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.