

ST Bus Travel
ESakal
राजीव डाके
ठाणे शहर : राज्य सरकारने एसटी प्रवाशांना विविध सवलती दिल्या आहेत. लाडक्या बहिणींना निम्म्या तिकिटासोबतच ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकाला मोफत प्रवास सेवा सुरु केली आहे; मात्र ही सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जरी सुरू केलेली असली तरी तिचा लाभ मात्र दुसरेच प्रवासी घेताना दिसत आहेत. आधार कार्डवरील जन्म तारखेत बदल करून काही प्रवासी जास्त वय दाखवून मोफत प्रवास करत आहेत. ठाणे एसटी विभागाने अशा शेकडो प्रवाशांचा गैरप्रकार उघडकीस आणून राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.