esakal | ठाणे स्थायी समितीची सभा गुंडाळली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाणे स्थायी समितीची सभा गुंडाळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनामुळे (Corona) महापालिकेची (Municipal) आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यात महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून, ठेकेदारांची बिले काढण्यासाठीही पैसे नसल्याने ती रखडली आहेत. याची गांभीयनि दाखल घेत उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी स्थायी समितीने आज महापालिकेच्या (Municipal) विविध विभागांची बैठक बोलावली होती; मात्र या बैठकीत संबंधित विभागाने माहितीच सादर न केल्याने स्थायी समिती सभापतींसह सदस्यांनी संताप व्यक्त करीत सभापती संजय भोईर यांनी बैठक बरखास्त केली.

ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठीही पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे बिले मिळावी यासाठी ठेकेदारांनी शहरातील कामे बंद करण्याचा इशारा दिला. या वेळी किमान जुन्या कामाची बिले तरी ठाणे महापालिकेने काढावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे. या सर्व घटनांचे मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले होते. त्यानुसार विभागनिहाय माहिती मागविली होती. कोणत्या विभागाची किती बिले शिल्लक आहेत. शिवाय पालिकचे उत्पन्न नेमके कशामुळे कमी झाले आहे, ते वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात.

हेही वाचा: पुणे : शाळांनी मागविली पालकांची संमतीपत्रे

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ कसा बसविता येऊ शकतो, यासाठी आज स्थायी समितीच्या सभागृहात सर्व विभागांची स्थायी समितीने आढावा बैठक घेतली; परंतु या बैठकीत ज्या विभागांकडून माहिती मागविली होती, त्यांनी ती माहितीच उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उत्पन्न वाढविण्याची पालिकेची मानसिकता नाही का, असा सवालही उपस्थित केला. पालिका अधिकारी सहकार्य करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ही सभा बरखास्त केली आहे.

loading image
go to top