बाहेर कोरोना घरात उकाडा; ठाणेकर हैराण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

कोरोनामुळे संचारबंदी त्यात वाढलेला उकाडा त्यामुळे गेला महिनाभर घरातच बसून असलेले नागरिक हैरण झाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी तर ठाणे शहरात किमान  27 अंश सेल्सिअस तर कमाल 39 अंश सेल्सिअश तापमानाची नोंद करण्यात आली.

ठाणे : कोरोनामुळे संचारबंदी त्यात वाढलेला उकाडा त्यामुळे गेला महिनाभर घरातच बसून असलेले नागरिक हैरण झाल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी तर ठाणे शहरात किमान  27 अंश सेल्सिअस तर कमाल 39 अंश सेल्सिअश तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून  शहरातील तापमानात सातत्याने वाढ होतं असून उन्हाळ्याचा त्रास अधिकच जाणवू लागला आहे. त्यातही दुपारच्या वेळी तापमान वाढत आहे, या वाढत्या उष्माने नागरिक हैराण झाले आहेत.

महत्त्वाची बातमी ः घरातच धावून 21 किलोमीटर मॅरेथॉन केली पूर्ण, लॉकडाऊनमध्ये मॅरेथॉनमटूंच्या ग्रुपचा 'इनडोअर टास्क'चा फंडा

शनिवारी दुपारी बारा पासून सायंकाळी पाच पर्यंत शहरात उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता.  शहरात दुपारी 1 वाजता 39.02 तापमानाची नोंद झाली. तर दिवसातील सर्वात कमी 27.08 अंश सेल्सिअस तापमानाची सकाळी साडेसहा  वाजता नोंद झाली.  
गेले काही वर्ष ठाणे शहराच्या तापमानात सातत्याने वाढ झाली आहे. आजच्या घडीला शहराचा विस्तार वाढत आहे. घोडबंदर पट्ट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात बांधकाम झाली आहेत.  त्यातही सध्या बांधकामात मोठ्या प्रमाणात काचेचा वापर केला जातो, काच हि उष्णता परावर्तित करते ती तापमान वाढीस कारणीभूत ठरते.

मोठी बातमी मिठाची शेती कोरोनात अळणीच... उत्पादन ठप्प 
 

खारफुटी नष्ट झाल्याने उष्णतेत वाढ
या परिसरात असलेल्या पाणथळ जागेमधील खारफुटी नष्ट होत आहे. त्यांत महत्वाचे म्हणजे ठाणे शहरामधून वाहणाऱ्या खाडीचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. तिच्यात फक्त गाळच साचला आहे यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होत आहे.  मिथेन हा हरित वायू असल्याने तो शहराचे तापमान वाढण्यास कारणीभूत असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

Thane temperature is going to reach 39 °c


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane temperature is going to reach 39 °c