

Nilje Railway Flyover closed for 5 months
ESakal
डोंबिवली : सध्या दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील सीटीपी ११ या प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र निळजे रेल्वे उड्डाण पुलाची उंची कमी असल्याने रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणाऱ्या प्रकल्पात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी हा जुना निळजे पूल तोडून त्याची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल पाच महिन्यांसाठी वाहतूक विभागाने वाहतूक निर्बंध जारी केले आहेत.