
Thane Latest News: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील येऊरच्या डोंगरावर गेलेल्या तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेले तरुण या जंगलात अडकले.
या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांसह पालिकेच्या टीडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेत १० तरुणांची सुखरूप सुटका केली. या मधमाशांच्या हल्यात सात जण जखमी झाले असून, तिघे गंभीर आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.