
ठाणे : महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवार १८ जून २०२५ रोजी सकाळी ९ वा. ते गुरूवार १९ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्या काळात ठाण्याच्या काही भागात १२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.