Thane Water Supply cut
मुंबई
Thane Water Supply: ठाण्यात २४ तास पाणीकपात! जाणून घ्या कधी अन् कोणत्या भागात परिणाम होणार?
Thane Water Supply Cut: ठाणे शहरात २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापर असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेने शहरातील २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पाईपलाईनच्या कामांमुळे ठाणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला असून यामुळे नागरिकांना वेळेआधीच पाणी जपून वापरा आणि पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

