...म्हणून पहिल्याच दिवशी उशीरा धावली एसी लोकल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

दुपारची 3.01ची लोकल 3.48 वाजता रवाना 

मुंबई, ता. 30 : रेल्वे राज्यमंत्र्याच्या विमानाला विलंब झाल्याने मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकलला पहिल्याच दिवशी "लेटमार्क' लागला. पनवेल स्थानकातून दुपारी 3.01 वाजता या लोकलला हिरवा झेंडा दाखवायचा होता; मात्र रेल्वे राज्यमंत्र्याचे विमान एक तास विलंबाने आल्याने ते कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरा पोहचले. परिणामी, एसी लोकल 3.47 वाजता रवाना करण्यात आली. तसेच, पश्‍चिम आणि मध्य रेल्वेवर प्रत्येकी एक एसी लोकल धावत आहे. 

हेही वाचा -  मध्य रेल्वेवर धावली पहिली एसी लोकल 

मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकलला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते गुरुवारी सीएसएमटी येथील कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. या वेळी मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी भविष्यात एसी लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच, आगामी अर्थसंकल्पात उपनगरी रेल्वेचे भाडेवाढ होऊ नये, रेल्वे स्थानकांत महिला शौचालयांची संख्या वाढवून लोकलच्या डब्यातही मोफत वायफाय देण्यात यावे, अशी मागणी शेख यांनी केली. 

महिला डब्यात स्वच्छतागृह असावे

कर्जत-खोपोली, कसारा आणि डहाणूपर्यंतच्या प्रवासासाठी अडीच-तीन तास लागतात. या लोकल प्रवासात महिलांचे विशेषत: गर्भवतींची बिकट अवस्था होते. त्यामुळे लोकलच्या डब्यात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करा, शी सूचना खासदार अरविंद सावंत यांनी केली. बीपीटीचा मालगाडी मार्ग मानखुर्दपर्यंत ब्रॉडगेज आहे. त्यावरून लोकल चालवून उपनगरी सेवेचा भार हलका करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

हेही वाचा - ठाणा सिग्नलवर गजरे विकणारी मुले चालली 'इस्त्रो'त

 

 

 web title : thats why AC local ran out late on the first day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thats why AC local ran out late on the first day