सीबीआय जाणीवपूर्वक दोन्ही अधिकार्यांना या प्रकरणात ओढत आहे : राज्य सरकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

सीबीआय जाणीवपूर्वक दोन्ही अधिकार्यांना या प्रकरणात ओढत आहे : राज्य सरकार

मुंबई : माजी ग्रुहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या सीबीआय तपासात राज्य सरकार अडथळा आणण्यासाठी प्रयत्न करत नाही, मात्र राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स बजावण्यात आमची हरकत आहे, असा खुलासा आज राज्य सरकार कडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.

देशमुख प्रकरणात सीबीआयने मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावले आहे. याला विरोध करणारी याचिका सरकारने केली आहे. विशेष सरकारी दरायस खंबाटा यांनी आज बाजू मांडली. सीबीआय जाणीवपूर्वक दोन्ही अधिकार्यांना या प्रकरणात ओढत आहे असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: आता बातम्या वाचण्यासोबत घ्या ऐकण्याचाही आनंद; ऐका 'सकाळ'चं पॉडकास्ट

सीबीआय कडून अतिरिक्त सौलिसिटर जनरल अमन लेखी यांनी सीलबंद अहवालात दाखल केला. मात्र हा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी खंबाटा यांनी केली. या अहवालात देशमुख यांच्या आरोपासंबंधित कागदपत्रे आहेत असा दावा सीबीआयने केला आहे. न्या नितीन जामदार आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे.

loading image
go to top