esakal | मुंबईत दैनंदिन आकडा पाचशेच्या वर
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबईत दैनंदिन आकडा पाचशेच्या वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात आज ३१८७ नवीन कोरोना रुग्ण सापडले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५,४७,७९३ झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. ३२५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६३,६८,५३० इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९७.२६ टक्के एवढे झाले आहे.

आज राज्यात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा १,३९,०११ इतका झाला आहे. राज्यातील मृत्युदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३६,६७५ इतकी आहे. नागपूर आणि अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ठाणे ८, नाशिक ९, पुणे २३, कोल्हापूर ६, औरंगाबाद १ आणि लातूर २ असे मृत्यू नोंदवले गेले.

हेही वाचा: औरंगाबाद : जीवे मारण्याचा धाक दाखवून लुटले

मुंबईत दैनंदिन आकडा पाचशेच्या वर
मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून आज दिवसभरात ५२७ नवीन बाधितांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ७,४२,५३८ वर पोहोचली आहे. ४०५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७,१९,२१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सहा कोविड मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा १६,१०३ वर पोचला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के असून कोविड वाढीचा दर ०.०६ टक्के आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून ११८५ दिवस झाला.आज दिवसभरात ३६,८८७ कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १,०३,१३,३८९ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या ४७२४ सक्रिय रुग्ण आहेत.

loading image
go to top