
Mumbai Latest News: कुटुंबीयांकडून लग्नाला होणाऱ्या विरोधाला कंटाळून एका प्रेमीयुगुलाने गरीब रथ मेलसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विक्रोळी रेल्वे स्थानकात घडली. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
नितेश दंडपल्ली (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितेश हा भांडुप येथील हनुमाननगर परिसरात राहत होता. त्याच परिसरातील राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमीयुगुलाच्या प्रेमाची माहिती काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी या दोघांच्या नात्याला जोरदार विरोध केला.