esakal | घणसोली नोड ऐरोलीला लवकरच जोडला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

घणसोली नोड ऐरोलीला लवकरच जोडला जाणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : घणसोली ते ऐरोली दरम्यान महापालिकेतर्फे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असले तरी फक्त कांदळवने असल्यामुळे दूर असणारे हे दोन्ही नोड उड्डाणपुलामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर जोडले जाणार आहेत. सध्या उड्डाणपुलाच्या कामासाठी महापालिकेला एमसीझेडए व सीआरझेड या दोन पर्यावरण संबंधी ना हरकत दाखल्याची प्रतीक्षा आहे.

हा दाखला मिळाल्यानंतर नव्या वर्षात उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे. सिडकोमार्फत नवी मुंबई वसवताना बेलापूर ते ऐरोली अशा २१ किलोमीटर लांबीचा रस्ता नियोजित होता. त्यापैकी १९ किमीचा रस्ता सिडकोने तयार केला. परंतु दरम्यान सीआरझेड आणि कांदळवनांमुळे घणसोली ते ऐरोली असा दोन किलो मीटर लांबीचा रस्ता सिडकोला तयार केला नाही. त्या दरम्यान महापालिकेतर्फे सहा पदरी उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलाच्या उभारणीकरिता तब्बल ३७१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपुलामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली, दिवा गाव, मुलुंड नाका येथे होणारी वाहतूक कोंडी फुटेल. उड्डाणपूल पुढे काटई बोगद्याला जोडला जाणार असल्याने कल्याण-डोंबिवली. बदलापूर, अंबरनाथ येथील वाहतुकीला फायदा होणार आहे.

हेही वाचा: औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कीर्ती कांबळे

सिडको-पालिकेच्या भागीदारीतून खर्च घणसोली-ऐरोली उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर या भागातील सिडकोच्या भूखंडांना सोन्याचे दर मिळतील. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या उभारणीत येणारा खर्च पालिका आणि सिडको दोघांकडून ५० टक्के भागवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

loading image
go to top