esakal | कळवा उड्डाणपूल दीड महिन्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कळवा उड्डाणपूल दीड महिन्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळवा : कळवा (Kalwa) पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीआधी म्हणजे दीड महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे खारेगाव (Kharegaon) येथील मृत्यूचे (Death) प्रवेशद्वार ठरलेले रेल्वे फाटक (Railway) कायमचे बंद होणार असून लोकलच्या (Local Train) फेऱ्या वाढण्यास मदत होणार आहे.

ठाणे पुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असलेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकचे काम, कळवा उड्डाणपूल, मुंब्रा खाडी पूल, डोंबिवली येथील कोपर पुल तसेच बदलापूर रेल्वे स्थानकांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मॅरेथॉन पाहणी दौरा केला.

गेली अनेक वर्षे संथगतीने सुरू असलेली ही विकासकामे फास्ट ट्रॅकवर आणून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या वेळी रेल्वे मार्गिकेवरून जाणारा कळवा उड्डाणपूल दीडमहिन्यात सुरू होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कळवा पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी उड्डाणपूल नसल्याने येथील रहिवासी प्रवासी जीव धोक्यात घालून खारेगाव फाटकातून जात होते. त्यामुळे अपघातांमध्ये अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा: काय चाललंय हे... महिनाभरापासून विद्यापीठात प्र-कुलगुरू नाही, यांचे पदही आहे रिक्त

खारेगाव फाटक मृत्यूचे प्रवेशद्वार ठरत असल्यामुळे ठाणे महापालिका आणि मध्य रेल्वेने येथे उड्डुणपूल उभारणीच्या कामाला सुरुवात केली. मात्र या उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. अखेर हे काम पूर्णत्वास येत असून दीड महिन्यात हा उडणपूल वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे.

हेही वाचा: संचारबंदीतही कोपर पुलाच्या कामाला वेग! 

रुंदीकरण सहा महिन्यांत

डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मवरील किरकोळ कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण होणार असून ठाणे दिशेकडील पादचारी पुलाचा आणि अप्पर कोपरपुलाचे रुंदीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांची पाहणी केल्यानंतर कोपर पुलाच्या रुंदीकरणाचे काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. तसेच कोपर स्थानकाबाहेरून कल्याण आवर्त मार्गासाठी जोडरस्त्याची मागणी करण्यात येत असून त्या दृष्टीनेही नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. या मुळे दोन्ही शहरांतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणातही घट होईल.

loading image
go to top