Mumbai Winter | मुंबईची थंडी सोशल मीडियावर ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

#MumbaiWinter:
Mumbai Winter | मुंबईची थंडी सोशल मीडियावर ट्रेंड

#MumbaiWinter: मुंबईची थंडी सोशल मीडियावर ट्रेंड; मीम्सचा पाऊस

मुंबई (Mumbai)ओळखली जाते तेथील गरमीसाठी, परंतु या हिवाळ्यात मात्र मुंबईतील किमान तापमानात (Minimum Temperature) लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे.सोमवारी तापमानात घट होऊन ते 13.2 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होतं. या परिस्थितीमध्ये लोक घरीच राहणं पसंत करत आहेत. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी पाऊसही पडला होता. भारतीय हवामान विभागाने (IMD) येणाऱ्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठी घट होणार असल्याचे सांगितले आहे. परंतु या भविष्यवाणीनंतर मुंबईकरांनी हवामानाविषययी मजेदार मीम्स शेयर करायला सुरुवात केली आहे. सोशल मिडीयावर (Social Media) मुंबई विंटर ट्रेंड (Mumbai Winter trend) पाहायाला मिळत आहेत. चला आज एक नजर टाकूया मुंबईच्या थंडीशी निगडीत अशाच काही मजेदार मीम्सवरती.

हेही वाचा: महाराष्ट्र गारठला! कुठे होणार पाऊस? कुठे वाढली थंडी?

एका मीम्समध्ये शाहरुख खानचं (Shahrukh Khan) प्रॉडक्शन हाऊस रेज चिलीज (Red Chillie) एंटरटेनमेंटचा समावेश आहे. त्यामध्ये दिलवालेच्या सेटवर शाहरुख खान, काजोल, रोहित शेट्टी आणि फराह खानचे बॅक द सीन फोटो शेयर केले आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंटने या पोस्टला कॅप्शन दिलंय, “स्वेटर की किमत तुम क्या जानो दिल्लीवालों. एक जमे हुए मुंबईकर.” सामान्यपणे लोकांमध्ये दिल्लीच्या थंडीविषयी चर्चा पाहायला मिळते. पण इकडे मुंबईतील थंडीविषयी चर्चा होत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top