esakal | मुंबईत तिसऱ्या लाटेची चिन्ह, दैनंदिन रुग्णसंख्या 530 वर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईत तिसऱ्या लाटेची चिन्ह, दैनंदिन रुग्णसंख्या 530 वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज नवीन रुग्णांचा आकडा वाढला असून आज 530 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची (Third Wave) चिन्हे सध्या दिसु लागल्याचे चित्र दिसते. मृत्यू मात्र नियंत्रणात असून आज दिवसभरात 4 कोविड मृत्यू झाले. मुंबईत (Mumbai) एकूण मृत्यूचा (Death) आकडा 16,004 वर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात अडीचशेपर्यंत खाली गेलेला नवीन बाधित रुग्णांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. आज थेट पाचशे च्या वर आकडा पोहोचल्याने चिंतेत भर पडली आहे. याआधी 11 जुलै ला 555 बाधित रुग्ण सापडले होते तर 12 जुलै ला 478 रुग्ण सापडल्याने 500 च्या आत रुग्ण आले होते. त्यानंतर साधारणता दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या 500 च्या वर पोहोचली आहे.

आज 530 नवीन रुग्ण रुग्णांसाह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,47,608 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 349 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,25,247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या 3,895 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा: सात मोटारसायकलींसह ‘मृत’ चोरटा अटक..दोन वर्षांपासून फरार

आज मृत झालेल्या 4 मृतांपैकी 3 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये चौघा पुरुषांचा समावेश होता. 2 मृतकांचे वय 40 ते 60 दरम्यान होते तर उर्वरित दोन मृतकांचे वय 60 वयोगटाच्या वर होते.

दरम्यान आज 48,521 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.09 टक्के इतका आहे. आतापर्यंत 95,51,541 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1253 दिवस असा आहे.

loading image
go to top