esakal | कल्याणमध्ये हजारो ग्राहकांचा चोरीत हात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कल्याणमध्ये हजारो ग्राहकांचा चोरीत हात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण (kalyan) पूर्व-पश्चिममधील हजारो ग्राहक वीजचोरी करत असल्याचे महावितरणच्या विशेष पथकामार्फत सुरू असलेल्या कारवाईत उघड झाले. कल्याण पूर्व-पश्चिम विभागातील सोनारपाडा, नांदिवली, काळेगाव, सांडप, काटेमानवली, कटाई, पारनाका, अन्सारी चौक, गोविंदवाडा, शिवाजी चौक भागात ५० पथकांद्वारे झालेल्या कारवाईत ९४ ठिकाणी एक लाख ७४ हजार युनिटची वीजचोरी व १९ ठिकाणी १० हजार ४०० युनिट विजेचा अनधिकृत वीज वापर करत असल्याचे समोर आले.

हेही वाचा: मुंबई : भाईंदरमध्ये रिक्षाप्रवास सुरक्षित!

कल्याण ग्रामीण आणि उल्हासनगर एक व दोन विभागांतील टिटवाळा, शहापूर, व्हिनस चौक, ३० सेक्शन, गायकवाड पाडा, तानाजी नगर, वुलन चाळ, खुंटवली आदी भागांत ९२ पथकांनी केलेल्या कारवाईत १२३ ठिकाणी वीजचोरी व ११ ठिकाणी अनधिकृत वीज वापर करत असल्याचे उघड झाले आहे. धडक मोहिमेत ४,६५९ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली आहे.

loading image
go to top