esakal | गोष्ट पडद्यामागील भूलतज्ञांची....
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गोष्ट पडद्यामागील भूलतज्ञांची....

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिशय अवघड शस्त्रक्रिया करतांना शल्य चिकित्सकसह भूलतज्ञांसमोर देखील मोठे आव्हान असते. मुंबई (Mumbai) महानगरपालिकेच्या केईएम (KEM) रुग्णालयात झालेल्या पहिल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सलग 17 तास चालली. यावेळी भुलतज्ञांना आपली तहान-भूक विसरून काम करावे लागले. झोपेचा थांगपत्ता नव्हता.थकवा आला असला तरी दाखवता येत नव्हता. आपल्या घरच्यांच्या शुभेच्छा घेऊन कामगिरी फत्ते करण्यासाठी निघालेले हे योद्ध्ये 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी गेले.

mumbai

mumbai

परराज्यातून आलेल्या एका 22 वर्षीय तरुणावर अवयव प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. केईएम रुग्णालयात हा विभाग सुरू होऊन साधारणता तीन वर्षे झाली. या विभागातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. एके ठिकाणी काम करत असतांना या पीडित तरुणाचे दोन्ही हात क्रशर मध्ये अडकल्याने त्याचे दोन्ही हाताचे पंजे निखळले. त्याला उपचारासाठी पालिकेच्या सर्वाधिक अत्याधुनिक केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवयव प्रत्यारोपण करून त्या तरुणाला इतर व्यक्तीचे पंजे बसवण्यात येणार होते. अवयवदान करणारा दाता मिळाल्यानंतर ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.

शस्त्रक्रियेसाठी प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले. मात्र ही शस्त्रक्रिया 15 ते 18 तास सतत सुरू राहणार असल्याने रुग्णाला भूल देणे हे मोठे आव्हान होते. यासाठी त्या विभागाच्या प्रमुख डॉ. इंद्राणी चिंचोली यांच्या नेतृत्वात 10 डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले. त्यात डॉ.इंद्राणी यांच्यासह प्रा. डॉ.श्वेता साळगावकर,डॉ.सुनील चापणे,डॉ. आरती कुलकर्णी यांच्यासह निवासी डॉक्टरांची पथक नेमले गेले. भुलतज्ञांच्या पथकामध्ये एकूण दहा डॉक्टरांचा समावेश होता.

11 ऑगस्ट ला अवयवदान शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. साधारणता सकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रक्रियेची पूर्वतयारी सुरू झाली. भूलतज्ज्ञांना यासाठी विशेष तयारी करावी लागली. यामध्ये शस्त्रक्रिया ज्यांच्यावर होणार तो रुग्ण आणि दाता यांच्या काही आरोग्य तपासण्या केल्या गेल्या. अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णाची शारीरिक प्रतिकार शक्ती कमी करावी लागते, हे मोठे जिकीरीचे काम असते. याशिवाय यादरम्यान रुग्णाला काही समस्या आल्या तर काय करायचचे ? त्यासाठी लागणारे रक्त ,एचएलए तपासण्या आदि वर काम करण्यात आले. एचएलए तपासण्या फार महत्वाच्या आहेत कारण या तपासण्या मॅच झालं तरच प्रत्यारोपण करता येत. याशिवाय रुग्णाच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती देखील असते त्यामुळे त्याचे समुपदेशन करणे गरजेचे असते. ते ही केले गेले.

हेही वाचा: नवी मुंबईतील कामगाराच्या हत्येचा उल्हासनगरात उलगडा

दुपारी 1 च्या दरम्यान शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली. यावेळी रुग्णाला भूल देण्याचे मोठे आव्हान होते. करण शस्त्रक्रिया सलग 15 ते 18 तास चालणार होती. भुलतज्ञांच्या पथकाला वेगवेगळया वेळेनुसार वेगवेगळी कामे नेमून देण्यात आली. त्यानुसार प्रत्येकाने आपली पोझिशन घेतली. हाताची शस्त्रक्रिया असल्याने केवळ हाताला भूल देण्यात आली. ही भूल काही वेळासाठी असते. त्यानुसार रुग्णाच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवण्यात आले. रुग्णाला अवश्यकतेनुसार भूल देण्यात आली. एक केलं अशी ही आली की केवळ हात नाही तर संपूर्ण शरीराला भूल देण्यात आली.

शास्त्रक्रिये दरम्यान केवळ भुल दिली म्हणजे काम संपलं असं नाही ,तर रुग्णाच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवावे लागले. त्याच्या काँशीयसनेसवर सतत लक्ष होते. आवश्यकतेनुसार पुन्हा भूल दिली गेली. सतत 17 तास शस्त्रक्रिया चालली. तो पर्यंत सर्व भूलतज्ज्ञांचे पथक तैनात होते. थकवा जाणवत असला तरी दाखवता येत नव्हता. चहा-पाणी,जेवणावर कुणाचे लक्ष नव्हते. अनेकांना सतत दहा,बारा,पंधरा ते सतरा तास थांबावे लागले. शस्त्रक्रिया यशस्वी करायची एव्हडच त्यावेळी डोक्यात असते. त्यासमोर तहान भूक काही नव्हते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सर्व पथकाने सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा: मुंबईतील उखडलेले पदपथ चकाचक होणार

या दिवशी केवळ एक नाही तर इतर ही शस्त्रक्रिया होत्या. त्यांचे काम देखील भूलतज्ज्ञांनी पार पाडले.केईएम हे मुंबईतील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. देशभरातून अनेक गंभीर रुग्ण मोठ्या शस्त्रक्रियांसाठी इथे येतात. त्यांच्यासाठी 18 ते 20 ऑपरेशन थेटर आहेत. दिवसभरात साधारणता 50 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया येथे होतात. यावेळी रुग्णांना भूल देण्याचे आणि त्यांची भूल उतरण्याचे काम भूलतज्ज्ञांना करावे लागते. यासाठी साधारणता सव्वाशे भूलतज्ज्ञांचे पथक तैनात आहे.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वी शास्त्रक्रीयांचा ओघ सुरूच आहे.मात्र त्यांच्या कामाची फारशी दखल मात्र घेतांना कुणी दिसत नाही याची कधी कधी खंत वाटते.

loading image
go to top