esakal | सकाळ इम्पॅक्ट: महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

सकाळ इम्पॅक्ट: महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा विसर पडलेला शालेय शिक्षण विभाग 'सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर ताळ्यावर आला. गांधी जयंती दिवशीच ठेवलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर पुढे ढकलल्याचे आज रात्री उशिरा जाहीर केले.

यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ४ ते ५ ऑक्टोबरला होणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुख्य तीन प्रवेश फेऱ्या आणि त्यानंतर एक विशेष फेरी आयोजित करून शालेय शिक्षण विभागाने एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारासमोर लोटांगण घेत शिक्षण विभागाने प्रथम येणाऱ्यास प्रथम (एफसीएफएस) प्रवेश टप्प्यासाठी तब्बल सात प्रवेश टप्प्याचे आयोजन केले होते. काही मूठभर संस्थांना बेकायदेशीर प्रवेशाचा लाभ व्हावा म्हणून हा सर्व प्रकार केल्याचा आरोपही केला जात आहे. यावर अनेक संघटनांनी आक्षेपही नोंदवले आहेत.

हेही वाचा: ICICI बँकेच्या ऑनलाईन बँकिंग सेवा ठप्प; ग्राहक वैतागले!

"तक्रार करू'

गांधी जयंती दिनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास दिरंगाई का केली याविषयी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी करणाऱ्या एनएसयूआयचे अध्यक्ष अमीर शेख यांनी याविषयी नाना पटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

loading image
go to top