esakal | पोल्ट्री व्यवसायाने पंख पसरले !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पोल्ट्री व्यवसायाने पंख पसरले !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : चांगले शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी (Job) मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे बेरोजगारीपेक्षा व्यवसाय उभा करणाऱ्यांची संख्या रायगड जिल्ह्यात वाढत आहे. त्यातही पोल्ट्री (Poltry) (कुक्कुटपालन व्यवसायाकडे (Bussiness) तरुणाईचा कल अधिक वाढत आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे तीन हजार हे व्यावसायिक आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा हा रायगड पॅटर्न राज्यातही उल्लेखनीय ठरत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण रोजगाराची वानवा आहे. भागात या कारणामुळे अनेक जण नोकरीच्या शोधात मुंबई, पुण्यासारख्या शहरात स्थलांतर करतात, परंतु अनेकांना समाधानकारक वेतन मिळत नसल्याने ते गावाचा रस्ता घरत आहेत. अशा तरुणांना पोल्ट्री व्यवसायाने मार्ग दाखवला आहे.

पिल्लांना खाद्य पदार्थ देणे, त्यांची देखभाल करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, चिकन आणि अंडी विकणे, अंडी आणि पक्ष्यांची वाहतूक करणारे आदी पूरक व्यवसायही याद्वारे मिळत आहेत. बेरोजगारीमुळे या व्यवसायात गेल्या १० वर्षांपासून तरुणाई मोठ्या प्रमाणात वळली आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात दिवसात ५७३ नवे कोरोना रुग्ण

जिल्ह्यात सध्या सुमारे तीन हजार पोल्ट्री व्यावसायिक आहेत. त्यापैकी सुमारे अडीच हजार व्यावसायिक हे तरुण आहेत. याद्वारे दरवर्षी सुमारे ३० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होत आहे. दरवर्षी सुमारे ३५० GG अर्ज कार्यालयात या व्यवसायासाठी येतात. यामध्ये अलिबाग, कर्जत, पेण, माणगाव, महाड, पनवेल या तालुक्यांतील तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आहे.

- डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड

loading image
go to top