esakal | रेल्वे पोलिसांच्या जागरूकतेमुळे युवक बचावला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

रेल्वे पोलिसांच्या जागरूकतेमुळे युवक बचावला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत : कर्जत (Karjat) रेल्वे (railway) स्थानकातील दोन पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक तरुण बचावला. ही घटना रविवारी घडली. सहायक पोलिस निरीक्षक अतुल ठोंबरे आणि पोलिस शिपाई समीर पठाण कर्जत रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर गस्त घालत होते.

हेही वाचा: ठाणे स्थानकाच्या सुरक्षेत वाढ

त्या वेळी मेघनाथ मुंडा (१८) हा खोपोलीत राहणारा तरुण खोपोलीकडे जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन गाडीखाली पडण्याची शक्यता होती. हा धोका ओळखून ठोंबरे आणि पठाण यांनी चपळाईने मुंडा यास बाजूस ओढून त्याचे प्राण वाचवले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी या दोन्ही पोलिसांचे कौतुक केले.

loading image
go to top