...तर प्रदूषणकारी कारखान्यांना टाळे

File Photo
File Photo

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील कारखान्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे तपासणी केली जाईल. मंडळाने सुचवलेल्या सुरक्षा यंत्रणांची अंमलबजावणी या कारखान्यांना करावीच लागेल; अन्यथा संबंधित कारखान्यांना कुलूप लावले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. 

डोंबिवलीमध्ये विविधरंगी पाऊस, गुलाबी रस्ते अशा जगावेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी; तसेच त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी आपण या परिसराचा दौरा केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण गुरुवारी (ता. 6) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रदूषण हा या भागातील मुख्य मुद्दा असून त्यावर ठोस कारवाई किंबहुना कार्यवाही आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. तीन टप्प्यात ही कार्यवाही केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात येथील कारखान्यांची घातक, कमी घातक; तसेच अन्य प्रकारात वर्गवारी केली जाईल. या कारखान्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे तपासणी केली जाईल.

मंडळाने सुचवलेल्या सुरक्षा यंत्रणांची अंमलबजावणी या कारखान्यांना करणे अनिवार्य असेल; अन्यथा कारखान्यांना कुलूप लावले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन दुरुस्त केली जाईल. तिसऱ्या टप्प्यात नागरी वस्तीला कारखान्यांमुळे होणारा प्रदूषणाचा त्रास दूर करण्यासाठी हे कारखाने अन्यत्र स्थलांतरित करण्यात येतील, असेही उद्धव यांनी सांगितले.

...Then locking pollution factories

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com