कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये पुन्हा लॉकडाउन ? खुद्द पालकमंत्र्यांनीच दिली 'ही' माहिती... 

kdmc
kdmc

कल्याण (वार्ताहर) : मुंबईसह दिवसेंदिवस कल्याण-डोंबिवली शहरांतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीपासून लॉकडाऊन शिथिल करून अनलॉक 1.0 सुरु करण्यात आला. त्यामुळे दोन-तीन महिन्यांपासून ठप्प असलेले व्यवहार पुन्हा नव्याने सुरु झाले. मात्र, असे असताना कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावे, असा विचार शहरातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पालिकेतील लोकप्रतिनिधींनी ही मागणी केली असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या बैठकीला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, पूर्वेचे आ. गणपत गायकवाड, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील उपस्थित होते. महापौर विनिता राणे, सभागृहनेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच पालिकेचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

पालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने शहरातील वाढत्या रुग्णसंख्या हाताळणे हे एक आव्हान असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावे असे मत व्यक्त करण्यात आले. सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनी या लॉकडाऊनमध्ये औषधांची दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकान बंद ठेवावेत, अशी सूचना केली. पालिका जाहीर करत असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

लोकप्रतिनिधींनी लॉक डाऊन पुन्हा लागू करावा असे विचार मांडले असले तरी प्रशासनाशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे, तिथे अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. पालिकेला 17 कोटींचा वाढीव निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. आवश्यकता भासल्यास अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही ते म्हणाले. शहरातील वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करून आयसीयू तसेच ऑक्सीजनची उपलब्धता वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या कामासाठी ज्या मनुष्यबळाचा वापर केला जात आहे, त्यांनाही अधिक इन्सेंटिव्ह देणे आवश्यक असल्यास ते दिले जावेत असेही शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com