डॉ. राजेंद्र शिंगणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅबबद्दल केली महत्त्वाची मागणी...

डॉ. राजेंद्र शिंगणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅबबद्दल केली महत्त्वाची मागणी...

मुंबई : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे  प्रामुख्याने  रेमडेसीवर  (Remdesivir) आणि टोसीलीझुमॅब (Tocilizumab) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोवीड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हे  व्यक्त केले आहे. या बाबत मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहीले आहे.

या पत्रात डॉ.शिंगणे यांनी कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे. या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे. रुग्णालयांकडुन दाखल असलेल्या रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जाते आहे. काही ठिकाणी ही औषधे जास्त प्रमाणात प्रिस्क्राईब केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहेत, कोविड रिपोर्ट येण्यापुर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे. 

कमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भितीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची जनतेच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्स मार्फत रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर कोणत्या दिवशी आणि कोणत्या परिस्थीतीत द्यावीत,  तसेच ही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का? याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे यासाठी कोविड टास्क फोर्सला योग्य निर्देश देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढवणार- 

कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून अन्न आणि औषध प्रशासनामार्फत संपुर्ण राज्यभरात कारवाया वाढवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहेत. 

काळाबाजाराच्या तक्रारी वाढत्या- 

अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने आतापर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई केली आहे, असे सांगुन डॉ. शिंगणे यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद येथुन येत असलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधले आहे. औषधांच्या काळाबाजाराला रोखण्यासाठी राज्यभर कारवाया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला सूचना दिल्या असून पोलिस गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस प्रशासना मार्फत प्राधान्याने कारवाया करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी ही विनंती डॉ. शिंगणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

there needs to be a proper guidelines while using remdesivir and tocilizumab

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com