बोरघाटातील शिंग्रोबा मंदिर अंधारात; काय आहे कारण वाचा!  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

खाेपाेली : बोरघाटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचे मंदिर आजही अंधारात आहे. या मंदिरात आजही वीज नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. याकडे धनगर समाजातील नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

महत्‍वाची बातमी : आता ऐतिहासिक किल्‍ल्‍यांवर पोलिसांचा पहारा! 

धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे वीर हुतात्मा शिंग्रोबा मंदिर हे बोरघाटात कित्येक वर्षांपासून आहे. या मंदिरात आजही वीज नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. मंदिरात वीज मिळावी, यासाठी शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

अनेक वेळा मंत्रालयातही पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यांच्या पदरी आजही निराशा आली असून, धनगर समाजातील नेत्यांचे व संबंधित मंत्र्यांचे या मंदिराकडे दुर्लक्ष झाले आहे. 

धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा मंदिरात आजही वीज पोहचू शकली नाही. यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ग्रुप ग्रामपंचायत अत्करगावचे सदस्य दत्तात्रय शेडगे यांनी सांगितले.

मोठी बातमी :  मांडवा जेट्टीजवळ प्रवासी बोट बुडाली 

वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाच्या मंदिरात वीज मिळावी, यासाठी कमिटीच्या वतीने अनेक वेळा मागणी करण्‍यात आली. यासाठी मंत्रालयातही फेऱ्या मारल्या; मात्र आजही मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
- बबन शेडगे, संस्थापक, शिंग्रोबा उत्सव कमिटी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no electricity at Shingroba Temple in Borghat