मन विषण्ण करणारी परिस्थिती ! KEM मध्ये ही परिस्थिती येईल अशी कुणी कल्पनातरी केली असेल का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यात मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होते

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यात मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होते. त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे, मुंबईतल्या केईएम रुग्णालयात मृतदेह ठेवण्यास जागा नाही आहे. या रुग्णालयातील शवगृह मृतदेहांनी पूर्णपणे भरून गेलं असल्याची माहिती समोर आली आहे. 

केईएम रुग्णालयातील शवगृह भरलं असून शवगृहाबाहेरही 25 मृतदेह ठेवण्यात आलेत. वेगवेगळ्या कारणांमुळे या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली नसून रुग्णालयातील जागाही भरली आहे. 

राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर, पण...

मजदूर युनियननं केली पीपीई किटची मागणी 

कोरोना रुग्णांचे मृतदेह आणि कोरोना न झालेल्या रुग्णांचा मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट मिळत नाही आहे. अनेक कर्मचारी दररोज अशा मृतदेहांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे अशा या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं केईएम रुग्णालयातल्या या मृतदेहांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, अशी मागणी मजदूर युनियननं केली आहे. तसंच या कर्मचाऱ्यांना पीपीई किट मिळावा असं देखील युनियननं स्पष्ट केलं आहे.

केईएम रुग्णालयातल्या शवगृहात 26 मृतदेह ठेवण्या इतकीच क्षमता आहे. त्यात आता हा शवगृह पूर्णपणे भरला आहे. शवगृहाच्या बाहेरही 25 मृतदेह ठेवण्यात आलेत. एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचे नातेवाईक, त्या भागात असलेले पोलिस आणि रुग्णवाहिका अशा सर्व गोष्टींची उपलब्धता आवश्यक असते. या गोष्टींशिवाय मृतदेह बाहेर काढणं शक्य नसते. मात्र सद्यपरिस्थिती पाहता या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत नाही आहेत. याच मुख्य कारणानं हे सर्व मृतदेह अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षेत ठेवले गेलेत. 

अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

जी परिस्थिती उद्धभवली आहे याचा विचार करुन या मृतदेहांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी आता केईएम रुग्णालयाच्या युनियनेनं केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड्सची कमतरता होती असं बोललं जातं होतं. बरेच रुग्ण हे वेटिंग लिस्टमध्ये होते. मात्र आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, मृतदेहांनाही अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर ठेवावं लागलं आहे.

there is no space to keep bodies of demised people in KEM hospital read heart wrenching story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no space to keep bodies of demised people in KEM hospital read heart wrenching story