मुंबईतून महाराष्ट्रातील शहरापर्यंत धावणारी एकही ट्रेन नाही! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाची साथ रोखण्यासाठी अमलात आलेले लॉकडाऊन हळूहळू ऊठवण्याच्या प्रक्रियेअंतर्गत 1 जूनपासून देशात 100 ट्रेन धावणार आहेत. त्यातील 23 ट्रेन मुंबईतून आहेत. आश्चर्य म्हणजे मुंबईतून महाराष्ट्रातील शहरापर्यंत धावणारी किंवा तेथून येणारी एकही ट्रेन नाही. 

मुंबई ः कोरोनाची साथ रोखण्यासाठी अमलात आलेले लॉकडाऊन हळूहळू ऊठवण्याच्या प्रक्रियेअंतर्गत 1 जूनपासून देशात 100 ट्रेन धावणार आहेत. त्यातील 23 ट्रेन मुंबईतून आहेत. आश्चर्य म्हणजे मुंबईतून महाराष्ट्रातील शहरापर्यंत धावणारी किंवा तेथून येणारी एकही ट्रेन नाही. 

एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

रेल्वे मंडळाने प्रकाशीत केलेल्या नव्या ट्रेनचे ऑनलाईन आरक्षण सुरु झाले. या नव्या ट्रेनमध्ये मुंबईहून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ट्रेन असतील. त्यात कृषीनगर एक्सप्रेस (लोकमान्य टिळक टर्मनिस गोरखपूर), कामायनी एक्सप्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी), महानगरी एक्सप्रेस (मुंबई सीएसटीएम - वाराणसी), वांद्रे टर्मिनस - गाझीपूर एक्सप्रेस तसेच वांद्रे टर्मिनस - गोरखपूर अवध एक्सप्रेस आणि मुंबई लखनौ पुष्पक एक्सप्रेस आहेत. तर दरभंगा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस - पटणा, वांद्रे टर्मिनस - मुझफ्फरपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र एक्सप्रेस आहेत.  
दक्षिण भारतात जाण्यासाठी गदग एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस (बंगळूर), हुसेन सागर एक्सप्रेस (हैदराबाद) आणि नेत्रावती एक्सप्रेस (कोकण रेल्वेमार्गे तिरुवअनंतपुरम) आहेत. पूर्व भारतासाठी कोणार्क एक्सप्रेस (भुवनेश्वर), हावडा मेल आणि गुवाहाटी एक्सप्रेस उपलब्ध आहेत. पश्चिम रेल्वेवरुन कर्णावती एक्सप्रेस (अहमदाबाद), जयपूर एक्सप्रेस, सूर्यनगरी एक्सप्रेस या गुजरात आणि राजस्थानसाठी तर पंजाबसाठी पश्चिम एक्सप्रेस आणि गोल्डन टेम्पल एक्सप्रेस आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

मुंबईतून सुटणाऱ्या तसेच मुंबईपर्यंत धावणाऱ्या ट्रेन व्यतिरीक्त दोन ट्रेन बृहन्मुंबईतून जातील. पनवेल, कल्याण, नाशिक मार्गे जाणारी एर्नाकुलम - हझरत निझामुद्दीन (दिल्ली) मंगला एक्सप्रेस आहे.  याशिवाय एर्नाकुलम - हझरत निझामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस पनवेल, वसई रोड मार्गे जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no train running from Mumbai to cities in Maharashtra! Read detailed news