दुचाकीवरून विद्यार्थ्यांची वाहतूकच नाही!

File Photo
File Photo

मुंबई ः रस्त्यांवरून दुचाकीने पालक विद्यार्थ्यांना शाळेत सोडतानाचे चित्र सर्वत्र रोज नजरेस पडत असताना, राज्य परिवहन विभागाच्या कारवाईत मात्र, तसे काही दिसून आले नाही. महामुंबईत दुचाकीने विना हेल्मेट आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक सर्रास होत असताना, दुसरीकडे परिवहन विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत या दोन्ही प्रकारांत फक्त १२ दोषी दुचाकीचालक आढळून आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य परिवहन विभागाच्या अनधिकृत स्कूल व्हॅन व बसेसच्या कारवाईच्या विशेष मोहिमेत आश्‍चर्यजनक आकडेवारी पुढे आली आहे. रस्त्यांवर सर्रासरित्या दुचाकीने विनाहेल्मेट आणि आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाहून नेणारे चित्र दिसत असताना, परिवहन विभागाच्या १६ दिवसांच्या तपासणी मोहिमेत महामुंबईत या दोन्ही कारवाईत फक्त १२ दुचाकी दोषी आढळल्या.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील अनधिकृत स्कूल व्हॅन आणि बसेसवर कारवाई करण्यासाठी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये आरटीओने परवानगी दिलेल्या स्कूल व्हॅन आणि बसेस, अवैध वाहतूक करणाऱ्या व्हॅन आणि बसेस; तर दुचाकीने विना हेल्मेट विद्यार्थी वाहून नेणे, दुचाकीने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहून नेणे, रिक्षाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणे यासंबंधी तपासणी करून दोषींवर कारवाई करायची होती.

मात्र, यामध्ये राज्यभरात दुचाकीवरून जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या दोषी दुचाकीचालकांची संख्या १०१ दाखवण्यात आली आहे; तर दुचाकीवरून विनाहेल्मेट विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्यांची संख्या १४६ दाखवण्यात आल्याने, विशेष मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

web title : There is no transport of students by bike in the state!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com