esakal | कल्याण-डोंबिवलीतही किलबिलाट होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कल्याण-डोंबिवलीतही किलबिलाट होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. त्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतही ४ ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत आदेश काढला असून चार दिवसांत शाळांनी तयारी करावी, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.

हेही वाचा: कल्याण-डोंबिवलीत 3 लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण

कल्याण-डोंबिवलीत सध्या २९३ शाळा असून त्यात ९२ हजार ९५७ विद्यार्थी शिकत आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार कल्याण डोंबिवलीत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात बुधवारी शिक्षण विभाग आणि शिक्षण समितीची बैठक पार पडली. त्या वेळी शाळा सुरू करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार आदेश काढत आज त्यावर आयुक्तांनीही शिक्कामोर्तब केले. हा आदेश चार दिवसांत शाळांना पाठवला जाईल. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी काही दिवसांपासून रोज १०० कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सर्व खबरदारी बाळगत शाळा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

loading image
go to top