...तर वीजग्राहकांना होऊ शकतो 750 रुपयांचा दंड; वाचा सविस्तर...

तेजस वाघमारे
Sunday, 12 July 2020

जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीज बिलांचे वाटप तसेच वीज बिल भरणा केंद्र सुरू केले आहे.

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे वीज बिलांचे धनादेश उशिरा वटत आहेत. वीज बिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे वीज बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड देखील पुढील वीज बिलात लागू शकतो. त्यामुळे वीजग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

इच्छाशक्तीचा विजय; अवघ्या दहा दिवसांत डोंबिवलीतील 91 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात...

जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीज बिलांचे वाटप तसेच वीज बिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीज बिल भरण्यास वेग आला आहे. ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र,  लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील ठाकरे सरकारबाबत संजय राऊत यांचं मोठं भाष्य; म्हणाले हे काही...

ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे वीजबिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. 

कोरोना रुग्णांसाठी संजिवनी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वाढणार; वाचा सविस्तर

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा करणे सद्यस्थितीत सोयीस्कर आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य द्यावे.

आरे कॉलनीत लॉकडाऊनचा फज्जा, 33 जणांविरोधात गुन्हा

ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल ॲप तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटचा वापर करावा. याशिवाय वीज बिलांवर महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: otherwise mahavitaran customers have to pay 750 rupees if...