विरार : गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून २० लाखांची रोकड लंपास | Robbery news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ATM robbery
विरार : गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून २० लाखांची रोकड लंपास

विरार : गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून २० लाखांची रोकड लंपास

विरार : वसईतील सातिवली येथे असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम (sbi bank atm) गॅस कटरने कापून चोरी केल्याची (money robbery) घटना सोमवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी एटीएममधील २० लाख रुपयांची रोकड लुटली. याबाबत वालिव पोलीस ठाण्यात (police complaint filed) गुन्हा दाखल झाला आहे. वसई पूर्व सातिवली येथील मौर्या नाक्याजवळ सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने (gas cutter) कापून ते पूर्णपणे जाळले. तसेच त्यातील २० लाख रुपये घेऊन पसार झाले आहेत. एटीएम ज्या गाळ्यात आहे, त्या गाळ्याच्या मालकाला एटीएमचा गाळा खुला दिसून आला.

हेही वाचा: राज ठाकरे 'मराठी हृदयसम्राट'; इतर उपाधी न लावण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. या घटनेच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता असे येथील नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी रोकड लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अंधारामुळे चोरट्यांची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद होऊ शकली नाहीत. मात्र, एका चारचाकी चे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे. टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

Web Title: Thief Robbed Twenty Lac Rupees From State Bank Of India Atm Using Gas Cutter Virar Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :robberySBIATMvirar
go to top