esakal | एसटी बँकेच्या व्याजदरात तिसऱ्यांदा कपात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

एसटी बँकेच्या व्याजदरात तिसऱ्यांदा कपात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळातील को.- आॅपरेटीव्ह बँकेने कर्जाच्या व्याजदरात तिसऱ्यांदा कपात करून ठेवीदारांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार आता घरबांधणी, घरखरेदीसाठी गृहकर्जावरील व्याज १०.२५ घटवून ९ टक्के करण्यात आले आहे. त्यासोबतच शैक्षणिक कर्जावरील व्याज १०.२५ ऐवजी ९ टक्के; तर तातडीचे व मध्यम मुदतीचे कर्ज १२ टक्क्यांवरून १०.७५ वर येणार आहे.

बुधवारी एसटी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक महामंडळाच्या मुख्यालयात पार पडली. बैठकीमध्ये मान्यताप्राप्त संघटनेच्या संचालक मंडळानी व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. बॅंकेचे अध्यक्ष तथा एस. टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, बॅंकेचे उपाध्यक्ष मंदार पोहोरे यांनीही व्याजदर कपातीबाबत संचालक मंडळाला सूचना केल्या. शिवाय एसटी सेवेबाहेरील जनतेला एसटी बॅंकेत ठेवी ठेवण्यासाठी आकर्षक योजना राबवण्याची योजना तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे बँक प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: ठामपा शाळेतील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या चिक्यामध्ये आळ्या

बँकेची वैशिष्ट्ये
- सहा महिने कोविड काळात कर्जावर मोरेट्रीयम (अधिस्थगन) देऊन एकही रुपया जास्तीचे व्याज अथवा चक्रवाढ व्याज एसटी बॅंकेने घेतले नाही.
- या पंचवार्षिकमध्ये सलग तीन वेळा व्याजदरात घट

loading image
go to top