सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ‘त्या’आठ डॉक्‍टरांना जामीन नामंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संघटनेकडे नोंदणी नसतानादेखील बेकायदा क्‍लिनिक उघडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्‍टरांवर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत पोलिस पथकाने आठ डॉक्‍टरांना अटक केली होती. या आठ बोगस डॉक्‍टरांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाचे न्या. राजेश गुप्ता यांनी गुरुवारी फेटाळला. 

ठाणे : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संघटनेकडे नोंदणी नसतानादेखील बेकायदा क्‍लिनिक उघडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्‍टरांवर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत पोलिस पथकाने आठ डॉक्‍टरांना अटक केली होती. त्यांच्याकडे अॅलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधाचा साठा आढळला होता. वैद्यकीय वैधता प्रमाणपत्र प्राप्त नसतानाही हे डॉक्‍टर रुग्णांवर उपचार करत होते. या आठ बोगस डॉक्‍टरांचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाचे न्या. राजेश गुप्ता यांनी गुरुवारी फेटाळला. 

ही बातमी वाचली का? उद्योजकांनी पुकारला बेमुदत बंद! वाचा नेमकं काय झालं..

याप्रकरणी सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला. कळव्यात बेकायदा दवाखाने चालविणाऱ्या बोगस डॉक्‍टरांबाबत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन प्रबंधक दिलीप डांगे यांनी तक्रार केली होती. यावरून ठाणे गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारी, २०२० रोजी केलेल्या कारवाईत आठ बोगस डॉक्‍टरांना अटक केली. 

ही बातमी वाचली का?...आता ऐतिहासिक किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा!

यात अलोक सुभाषचंद्र सिंह (भास्करनगर,कळवा), रामजित कंचन गौतम (वाघोबानगर, कळवा), गोपाळ बाबू विश्वास (मनीषानगर गेट नं १, कळवा), रामतेज मोहन प्रसाद (आझाद हिंद चाळ, वाघोबानगर, कळवा), सुभाषचंद्र राजाराम यादव (आनंदनगर, कळवा, पूर्व), जयप्रकाश बालजी विश्वकर्मा (कळवा, पौंडपाडा पोलिस चाळ), दीपक बाबू विश्वास, (कळवा रेल्वे स्थानकाजवळ), सत्यनारायण लालमन बीड (सद्गुरू चाळ, वाघोबानगर, कळवा) यांचा समावेश आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Those' eight dummy doctors Bail not granted in thane