esakal | रोहा रस्ता बांधण्याची वल्गना करणारे गायब
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

रोहा रस्ता बांधण्याची वल्गना करणारे गायब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग-रोहा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०१६ विधिमंडळात आवाज उठवला होता. त्या वेळी केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील मंत्र्यांची भेट घेऊन निधी मंजूर करून घेतला. या रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. विरोधकांनी हा रस्ता स्वखर्चाने तयार करण्याच्या वल्गना केल्या होत्या. ते गायव आहेत.

अडीच वर्षांत या रस्त्याकडे त्यांनी पाहिलेदेखील नाही. स्वखर्चाने रस्ता तयार करणारा जन्माला यायचा आहे. अशा शब्दांत शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांवर बुधवारी हल्ला चढवला. अलिबाग-रोहा मार्गाच्या दुरुस्तीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने खानाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य संज पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नगरसेविका चित्रलेखा पाटील, आनंद बुरांडे, प्रकाश पाटील, विक्रांत वार्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: एमपीएससीच्या परीक्षेसाठी दीड तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संयुक्त बैठक झाली. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यानुसार या रस्त्याच्या कामांसाठी निधीही मंजूर झाला. निविदांसह कायदेशही काढले, परंतु त्या वेळी विरोधकांनी रस्ता अडवण्याचे काम केले. | निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांत रस्त्याचे काम करीन अशा वल्गना विरोधकांनी केल्या होत्या, पण रस्त्याचे काम झालेच नाही, असे पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top