
Thousands of Adivasis rally at Palghar Collector Office, demonstrating strength to highlight their demands.
Sakal
-निखिल मेस्त्री
पालघर: बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर त्यांची शक्ती प्रदर्शन आणि मोर्चे सुरू आहेत. मात्र आमच्या प्रवर्गात आरक्षण कदापी घेऊ देणार नाही, असे प्रत्युत्तर देत जिल्हाभरातील आदिवासी समाजाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक दिली. लढेंगे जितेंगे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा एकमुखी घोषणानी पालघर परिसर दुमदुमून गेला.