परदेशी प्रवाशांकडून लाच घेऊन बेकायदेशीररित्या घरी जाण्याची परवानगी देणाऱ्या अभियंत्यांसह तिघांवर गुन्हा

सुमित बागुल
Saturday, 16 January 2021

महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरु केली असून संबंधितांवर खात्याअंतर्गत कारवाई होणार आहे.

मुंबई : परदेशातून आलेल्याा प्रवाशांकडून लाच घेऊन बेकायदेशीर रित्या घरी जाण्याची परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या दुय्यम अभियंत्यांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरु केली असून संबंधितांवर खात्याअंतर्गत कारवाई होणार आहे.

UK मध्ये कोविडचा नवा प्रकार आढळल्याने 21 डिसेंबर पासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण व्हावे लागते. मात्र, काही दिवसांपुर्वी विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या महापालिकेच्या दुय्यम अभियंत्यासह तीन कर्मचार्यांनी काही जणांना पैसे घेऊन घरी जाण्याची परवानगी दिली. या प्रकरणी पालिकेने चौकशी सुरु करुन सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Unmasking Happiness | पोस्ट कोविडमध्ये जपा फुफ्फुसांचे आरोग्य

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार ही कारवाई करण्यात येत आहे.यात कैद आणि दंड अशा प्रकारची कारवाई होऊ शकते.तसेच या तिघांना नोकरीतून बडतर्फ केले जाण्याची शक्यता आहे.

Three charged with taking bribe from foreign travelers and allowing to enter the country illegally


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three charged with taking bribe from foreign travelers and allowing to enter the country illegally